संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: भिंगारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या सर्व योजना या भाजपा भिंगार मंडलध्यक्ष तथा भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड मानद सदस्य वसंत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला.हाच भाजपा भिंगार पॅटर्न ‘ संपूर्ण नगर शहरात राबविण्यासाठी व नगर शहरातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी’नी राबविलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीच, तत्पूर्वी आम्हा सर्वांच्या पक्ष कामकाजाचे पक्षश्रेष्ठींनी अवलोकन करून एकनिष्ठ असणारे भाजपाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी वसंत राठोड यांची पक्षहित पाहाता नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाच्या वरिष्ठ प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे भाजपा युवा मोर्चा भिंगार मंडलध्यक्ष किशोर कटोरे यांच्यासह भिंगार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीमुळे भाजपा अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी आता कोण होणार? याबाबत अहमदनगर शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डचे मानद सदस्य तथा भाजपाचे वसंत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत भिंगार शहरात उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, स्व:निधी योजना, मुद्रा योजना, ई- श्रम कार्ड योजना यासर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलेच, परंतु या सर्व योजनांचा गरिब, गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे काम आम्ही सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. वसंत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या हितार्थ आम्ही केलेल्या कामाचे अवलोकन करून पक्षांशी एकनिष्ठ असणारे वसंत राठोड यांची अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड व्हावी, अशी मागणी भाजपाच्या वरिष्ठ पदाका-याकडे भाजपा युवा मोर्चा भिंगार मंडलध्यक्ष किशोर कटोरे यांच्यासह अनंत रासने, आनंद बोथरा, सौरभ रासने, ब्रिजेश लाड, संतोष हजारे, कमलेश धर्माधिकारी, अक्षय भांड, राकेश भाकरे, लक्ष्मीकांत तिवारी, कवित रासने, महेंद्र जाधव, योगेश दळवी, सचिन दरेकर आदिंसह कार्यकर्त्यांनी केली आहे.
भाजपचे दक्षिण, उत्तर व अहमदनगर शहर हे तिन्ही जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी दि.११ व दि. १२ मे रोजी नगरमध्ये येणार आहेत. या दरम्यान भाजपचे अहमदनगर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून तो अहवाल प्रदेशाध्यक्ष माधव भंडारी यांच्याकडे सादर करणार आहेत. यामुळेच अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी वसंत राठोड यांच्या निवडीची मागणी भाजपा युवा मोर्चा भिंगार मंडलध्यक्ष किशोर कटोरे यांच्यासह भिंगार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
