भाजपार्टीच्या वतीने लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पा. यांच्या प्रचारार्थ चौक सभा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : नगर दक्षिणेचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पा. यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील माणिक चौक, भिंगारवाला चौक, शहाजी रोड, अर्बन बँक या चौकात महेंद्र भैय्या गंधे विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कॉर्नर सभा आयोजित करण्यात आले होते.
यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, तुषार पोटे, ऋग्वेद गंधे,बाबासाहेब सानप, संतोष गांधी, अजय चितळे, वसंत राठोड, अनिल गट्टानी, नरेश चव्हाण, रोहन शेलार, गोकुळ काळे, सुमित बटुळे, ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब भुजबळ, श्रीकांत फंड, अनिल तावरे, अनिल निकम,सुरेखा जंगम, महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, कुसुमताई शेलार, कालिंदी केसकर, वंदना पंडित, भाग्यश्री कुलकर्णी आदीसह भारतीय जनता पार्टीचे शहराचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महिंद्र गंधे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेकडून भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी शहरातील प्रत्येक आजपासून चौकात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तुषार पोटे यांनी प्रस्तावना केली.