संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतक-यांना राज्य सरकारने तातडीची आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी अहमदनगर भाजपाचे लक्षणीक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि.१४) करण्यात आले. यावेळी भाजपाचे खा.डाॅ सुजय विखे पा, माजीमंञी प्रा.राम शिंदे, शिवाजी कर्डीले यांनी महाविकास आघाडी सरकारावर कडकडून टीका केली.
यावेळी उपोषणात आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रा.भानुदास बेरड, उपाध्यक्ष धनंजय बडे पा, जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.