संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथडीॕ : तालुक्याच्या पूर्व भागातील अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या भगवानगड व ४६ गावांना जायकवाडी धरणातून थेट पाणी पुरवठा योजने संदर्भात उद्या दि.१५ डिसेंबर रौजी मुंबई येथे मंत्रालयात सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यातृ आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी दिली.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत ही बैठक आयोजित केली असून या बैठकीतून सदर योजनेला चालना मिळेल असे ढाकणे यांनी सांगितले.
अॕड.ढाकणे म्हणाले,आॕगस्ट महिन्यात संस्कार भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्याकडे आपण व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.राजश्री घुले यांनी वेधले.तसेच दोन महिन्यापूवीॕ ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडेही पाथडीॕच्या दौऱ्यात ही मागणी लावून धरली.त्यानंतर दोन्ही नेत्यांनी उद्याच्या बैठकीचे आयोजन केले आहे.बैठकीसाठी मी स्वतः तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले उपस्थित राहणार आहोत.भगवानगड व ४६ गावांना जायकवाडी धरणातून पाईपलाईन व्दारे पाणी पुरवठा होणार असून त्यासाठी १९० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.या पूर्व भागातील गावांना नेहमीच पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असते.मात्र भाजपच्या नेत्यांनी या विषयावर घाणेरडे राजकारण करून स्वस्तात प्रसिद्धी मिळवून स्वतःचे सत्कार घडवून आणले.योजनेला मंजूरी मिळाल्याचा कांगावा करत दुष्काळी लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला.मात्र अशी हि कोणतीही मंजूरी नसल्याचे स्पष्ट झाल्यावर ही नेते मंडळी तोंडावर पडली.परंतु आपण मागच्या तीन महिन्यात सातत्याने मुंबई येथे जात सदर योजनेला मंजूरी मिळावी यासाठी नेटाने प्रयत्न केले. त्यासाठी माजी आमदार घुले यांचीही विशेष साथ मिळाली.उद्याच्या बैठकीत या योजनेला खर्या अथाॕने मुतॕस्वरूप मिळेल व प्रत्यक्षात कामही सुरू होईल.याचे सर्व श्रेय हे महाविकास आघाडु सरकारचे असेल. भावनिक विषयावरून स्वाथीॕ राजकारण करण्याची पध्दत राष्ट्रवादी काँग्रेसची नाही.मागच्या दोन,वषाॕत मतदारसंघासाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर करत अनेक कामांना गती मिळवून दिली.तसेच शेवगाव व पाथडीॕ शहरासाठीही स्वतंत्र पाणी योजनांनाही आपण व घुले यांनी मंजूरी मिळवली असे ढाकणे यांनी शेवटी सांगितले.