👉मालेवाडी जिल्हा परिषद गटात विविध विकासकामांचे उद्घाटन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- मंजूर नसलेल्या योजनेबाबत केवळ नारळ फोडले, पेढे वाटून फसवणूक केली. लोकांना भावनिक करत कामाचा गाजावाजा करून उद्घाटन विरोधकांनी केले. बोलणाऱ्याचे हुलगे विकले जात आहेत, माझे काय चुकले? मी ३० वर्षे प्रामाणिक काम केले. मला वाटले आतातरी फळ मिळेल; पण आपण भावनेच्या आहारी गेलात. त्यामुळे विरोधकाला यश मिळाले. आता तरी माझ्याबरोबर राहणार आहात का?, असा सवाल करत येत्या काळातही सामांन्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात माझा संघर्ष सुरू राहणार, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले.
मालेवाडी येथील जिल्हा परिषदच्या जन सुविधा योजनेतून बाधंण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सालसिदबाबा देवस्तानचे कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी महंत हनुमान शास्त्री, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे, राष्ट्रवादीचे तालुका युवाध्यक्ष महारुद्र कीर्तने, बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे, किरण खेडकर, मालेवाडीचे सरपंच अजिनाथ दराडे, माजी सरपंच पांडुरंग खेडकर, ढाकणवाडीचे उपसरपंच सुनील ढाकणे, मिडसागवीचे सरपंच भगवान हजारे, उपसरपंच विष्णू थोरात, शौकत बागवान, गणेश सुपेकर, राजेंद्र जगताप, अंबादास राऊत, दीपक ढाकणे आदी उपस्थित होते.
भालगाव जिल्हा परिषद गटातील मालेवाडी जवळवाडी, कीर्तनवाडी, खरवंडी कासार येथे झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व मंजूर कामाचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले.
ॲड. ढाकणे म्हणाले, मी तीन पराभव पचविले; मात्र घरात बसलो नाही. सामांन्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात उभा राहिलो आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून भवरवाडी, भालगाव, भारजवाडी काटेवाडी येथे रस्ते केले. पाच वर्षात १५ कोटी रुपयाचा विकास निधी आणून या गटामध्ये कामे केली आहेत. रस्ते बंधारे, स्मशानभूमी, शाळा खोल्या यामधून झाल्या आहेत. विरोधक निवडणुकीत भावनेचा खेळ करतात. त्यांचे हुलगे विकत आहेत, माझे काय चुकले, ते मला सांगा!, येत्या काळात भावनेच्या आहारी जाऊ नका, असे त्यांनी आव्हान केले.
‘शाळेला सुविधा देऊ शकला नाही’ स्वातंत्र मिळून ७० वर्षे झाले. तेव्हापासून निम्मी सत्ता आमची ( आमदार राजळे) होती. आपण जिल्हा परिषदचे पद भूषविले व आपल्याकडे आमदाराकी असताना खरवंडी कासार सारख्या मोठ्या गावातील केंद्र शाळेला इमारत व शाळेला सुविधा देऊ शकला नाही. हे तुमचे अपयश आहे, असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे यांनी लगावला.
श्री राजळे म्हणाले की, सध्या तालुक्यात काहींना कार्यसम्राट नाव लावले जाते, पण तुम्ही सत्तेवर असून काही करत नाही. तुमचे कार्य कुठे दिसत नाही, तर फक्त तुम्ही सम्राट दिसता. आपण कार्यसम्राट नसून कोठेही जा नारळ फोडा, या तुमच्या पद्धतीमुळे तुम्ही नारळ सम्राट आहात, असे आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता शिवशंकर राजळे यांनी टोला लगावला.
दरम्यान, खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद शाळाच्या खोलीचे भूमिपुजन केदारेश्वरचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले.