संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : महाराष्ट्राच्या जुन्या परंपर असणा-या
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात आली आहे. या चांगल्या निर्णयाचे स्वागत करीत आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी बैलगाडी, घोडागाडीत बसून आनंद व्यक्त करीत मोठा जल्लोष केला.
2017 साली न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. त्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडा प्रेमीनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या निर्णयावर चर्चा होऊन बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्र जुनी परंपरा आहे. शेतकरी बांधव गावोगावी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत असतात. त्यामुळे ही परंपरा पुन्हा एकदा सुरु झाली आहे त्यामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलगाडा संघटनेने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत मुळे न्याय मिळाला आहे. त्यामुळे मी सर्व संघटनांचे आभारी आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवल्यानंतर आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्रामभैय्या जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, अर्बन सेलचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद शिंदे, दगडू मामा पवार, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, संजय सत्रे, रोहित डागवाले, श्याम भाऊ लोंढे, निलेश शिंदे, अक्षय जाधव, दिलीप मांडगे,प्रकाश काळे, बाबू दातरंगे, किरण शेडाळे, विष्णू जाधव, साहिल सय्यद, समीर जागीरदार, बाळासाहेब राऊत, शुभम लोंढे, दत्तात्रय भिंगारदिवे, अमित खामकर आदी उपस्थित होते.