संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक होताना पोलिसांनी पकडले की, हे सर्व बंद असतानाही कुणाच्या आशीर्वादाने चाललं आहे, असे रविवारी (दि.२९) अहमदनगर एमआयडीसी पोलिसांनी वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्यावर अनेकजणांनी शंका उपस्थित केल्या.
या कारवाईत नगर-मनमाडरोड गजीनन कॉलनी नवनागापुर या ठिकाणी रविवारी (दि.२९) सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास तब्बल ३० हजार रु.किं.ची शासकीय मालकीची विनापरवाना भरलेली वाळू वाहतूक करणारी २० लाख रु.किं.चा पांढ-या रंगाचा विनानंबर असलेला डंपर पकडला. यात आप्पासाहेब लिंबाजी शिरसाठ (रा.बाभळगांव मुळाड्यम फाटा रा.राहुरी जि.अ नगर) याला पकडण्यात आले. परंतु त्याचा साथीदार दिपक बदक माळी , रा. नांदगांव ता जि अ नगर) हा फरार झाला.
याबाबत पोना भास्कर मिसाळ यांच्या फिर्यादीवरून गुरनं कलम ७९/२०२३ भा.द.वी कलम ३७९,३४ सह पर्यावरण (संरक्षण) अधि चे कलम १५,३ प्रमाणे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री आठरे यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोसई श्री महाजन हे करीत आहेत.