संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
सोमराज बडे
पाथर्डी : भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीने २२मे २०२३ पासून ते आज पर्यंत पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात सामील असणारे सर्वच गावांचा दौरा पूर्ण केला असून मतदारसंघातील प्रत्येक वाडी,वस्तीवर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यामध्ये मध्ये शेतकऱ्यांसाठी केलेले काम तसेच पक्षाची दलित ,अल्पसंख्यांक व शेतकऱ्यांसाठी असलेली धोरणे अशी सर्व माहीती तेलंगणा मॉडेलच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात पोचवले आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात सुमारे पाच हजार सभासदाची नोंदणी पूर्ण केलेली आहे. यामध्ये शेतकरी ,कष्टकरी, महिला तसेच तरुण वर्गाची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ,अस्थिरता व राजकारणाची अत्यंत रसातळाला गेलेली पातळी पाहता, समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांचा व शेतकऱ्यांचा भारत राष्ट्र समिती पक्षाला (बी.आर.एस) प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशी माहीती पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदार संघाचे समन्वयक संदिप राजळे यांनी सांगितले.
संपूर्ण शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा गावागावात दौरा पूर्ण झाल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचार विनिमय करण्यासाठी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्याची बैठक रविवार (दि. ९) रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता नेवासा रोड शेवगाव येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीसाठी पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे तसेच सर्व पत्रकार बांधवांनी पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे. सदर बैठकीसाठी भारत राष्ट्र समिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वय मा. दशरथ सावंत, बीआरएस पक्ष संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माणिक कदम, पक्षाचे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब सानप,घनश्याम शेलार, तसेच जिल्हा समन्वयक मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यकर्ता बैठकीस मोठ्या संख्येने पाथर्डी – शेवगाव विधानसभा मतदार
संघातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मतदारसंघाचे मुख्य समन्वयक संदीप राजळे तसेच शेवगाव तालुक्याचे नेते पप्पूदादा केदार पाथर्डी तालुक्याचे नेते आदिनाथ बटुळे यांनी आहे.