बनावट सैन्य अधिकारी भरती रॅकेट चालविणारा आरोपीस अटक : अ.नगर भिंगार कॅम्प पोलिस व पुणे दक्षिणी कमान मिलीटरी इंटेलिजन्स, पुणे यांची संयुक्त कारवाई

बनावट सैन्य अधिकारी भरती रॅकेट चालविणारा आरोपीस अटक : अ.नगर भिंगार कॅम्प पोलिस व पुणे दक्षिणी कमान मिलीटरी इंटेलिजन्स, पुणे यांची संयुक्त कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : देशभरात बनावट सैन्य अधिकारी भरती रॅकेट चालविणारा आरोपीस पकडण्यात आले आहे. ही कारवाई अहमदनगर भिंगार कॅम्प पोलिस व दक्षिणी कमान मिलीटरी इंटेलिजन्स, पुणे यांची संयुक्तपणे करण्यात आली आहे. सत्यजित भरत कांबळे (रा.श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
अहमदनगर एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगदिश मुलगीर, पोउनि उमेश पतंगे, पोहेकॉ संदीप घोडके, दीपक शिंदे, रवि टकले, पोकाॅ प्रमोद लहारे, समीर शेख, दक्षिण मोबाईल सेलचे पोकाॅ नितीन शिंदे, राहुल गुंडू व दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी संयुक्त कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते दि. २८ मे २०२२ रोजी पर्यंत आर्मी कॅम्प मुठी चौक, जामखेडरोड (अहमदनगर) येथे आरोपी सत्यजित भरत कांबळे (रा.श्रीगोंदा, जि. अहमदनगर), बापू छबू आव्हाड (रा. आंबेगाव, पो. पाचोरा, ता. येवला, जि. नाशिक), राहुल सुमंत गुरव (रा. चौसाळा, जि. बीड) यांनी संगनमत करून फिर्यादी भगवान काशिनाथ घुगे, (रा. पास्ते, ता. सिन्नर. जि. नाशिक) व अन्य भारतीय सैन्य दलात भरतीची तयारी करणा-या युवकांना आम्ही आर्मीमध्ये मेजर पदावर नोकरीस आहे, असे भासवून तसेच आरोपींनी आर्मीचा गणवेश परिधान करून तिचा गैरवापर करून आम्ही तुम्हाला आर्मीमध्ये नोकरी लावून देतो, असे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवीदिल्ली येथील युवकांना संपर्क करुन त्यांना विविध ठिकाणी बनावट ट्रेनिंग सेंटर येथे बोलवून त्यांना टेनिंग देवून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व आरटीजिएस ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेऊन फसवणूक केली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६४/२०२४ भादविक ४२०, ४६८, ४७५, ४६५, ४१७, १७१ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अहमदनगर एसपी राकेश ओला यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि जगदिश मुलगीर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करून गोपनिय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी सत्यजित भरत कांबळे (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) हा दिल्ली येथे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एसपी राकेश ओला यांच्या आदेशाने भिंगार कॅम्प पोलीस टीम व दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजन्स (पुणे) यांनी संयुक्त कारवाई करुन, आरोपी सत्यजीत भरत कांबळे याचा शोध दिल्ली येथे जाऊन घेतला. या दरम्यान आरोपीस पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने तो दिल्ली येथून महाराष्ट्रात पळून गेला असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळाल्याने आरोपीस दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी बेलापुर (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथे सापळा रचून तो पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस करता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन मी व माझे इतर साथीदारांनी भारतीय सैन्य दल व मिलीटरी इंजिनिअरींग सर्व्हिसेस येथे अधिकारी म्हणून भरती करुन देतो, असे म्हणून अन्य युवकांकडून प्रत्येकी ७ ते ८ लाख रुपये घेतले आहे. यामध्ये महिला दलाल देखील सामिल असण्याची शक्यता आहे. तसेच भारतातील विविध राज्य महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटर यांच्याशी संपर्क करुन युवकांना देहराडून व अहमदनगर येथील आर्मी परिसरात बोलावून युवकांना प्रशिक्षण देतो. पैसे देणा-या उमेदवारांना सेना दलातील मुख्याअभियंता अधिकारी आणि सेवानिवृत्त दक्षिणी कमान मुख्यअधिकारी यांच्याकडील बनावट नियुक्ती पत्र देत असे, अशी माहिती दिल्याने आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
पुढील तपास सहा.पो.निरी. जगदिश मुलगीर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. उमेश पतंगे हे करीत आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!