बदलापूर घटनेचा शरद पवार गटाकडून काळ्याफिती बांधून निषेध
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी-बदलापूर येथील बाललैंगिक अत्याचाराची घटना सरकारी धोरणांच्या तोंडाला कायम फासणारी असून घृणास्पद घटना झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी केविलवाणा प्रयत्न केला हे अतिशय आश्चर्यकारक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केले.
शहरातील आंबेडकर पुतळा समोर बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुका आंदोलन केले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे वैभव दहिफळे चंद्रकांत भापकर अतिश निराळी राजेंद्र बोरुडे अरविंद सोनटक्के योगेश रासने अक्रम आता वसंतराव बोरुडे दिगंबर राव गाडे वसंतराव आमटे आदी उपस्थित होते.
ढाकणे म्हणाले राज्यात मागील दोन वर्षांपासून मुलींवर व महिलांवरील अत्याचा प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे बदलापूर ची घटना अतिशय निंदनीय आहे एका चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होऊ नये ही घटना झाकण्यासाठी तथाकथित सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता पणाला लावली मात्र जनतेच्या दबावा पुढे त्यांना अखेर झुकावे लागले ही खरी ताकद जनता जनार्दनाची आहे त्यामुळे इथून पुढे लोकांनी अत्याचाराचा विरोधात अन्यायाच्या विरोधात पेट्रोल उठल्याशिवाय सरकार न्याय देणार नाही हे लक्षात ठेवावे बदलापूरच्या घटनेला खरा राजकीय रंग राज्य सरकारमधील काही नेत्यांनीच दिला. महाविकास आघाडीच्या आजच्या बंद उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मागे घेण्यात आला असला तरी निषेध आंदोलन राज्यभर होत आहेत अन्याय व अत्याचाराचा विरोधात सर्वांनी एकजूट दाखवावी असे आवाहन ढाकणे यांनी शेवटी केले.