संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः पुणे या ठिकाणाहून फुस लावून पळवून आणलेल्या मुलीची सुटका करून आरोपीस पकडून देण्याची कारवाई नगर एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. सुभाष पवार (वय42) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई जाधव, पोहेकॉ गणेश चौधरी, पोहेकॉ राजेेंद्र सुद्रिक, पोना विष्णु भागवत, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ नवनाथ दहिफळे, पोकॉ राजेश राठोड, मोबाईल सेल पोकॉ राहुल गुंडू आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.27 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे सपोनि माणिक चौधरी यांना दूध डेअरी चौक, एमआयडीसी हद्दीत एकासोबत एका अल्पवयीन मुलीला घेऊन आल्याची माहिती मिळाली. सपोनि श्री चौधरी यांनी तात्काळ पोलीस ठाण्याचे नाईट बीट मार्शल डयुटीस असलेल्या अंमलदार यांना माहीती कळवून खात्री करण्यास सांगितले. त्या ठिकाणी पोसई जाधव, पोकॉ नवनाथ दहिफळे, पोकॉ राजेश राठोड, पोकॉ किशोर जाधव, मपोकॉ बेंद्रे यांनी जाऊन खात्री केली असता तेथे एकजण व एक मुलगी मिळून आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुभाष पवार असे सांगितले. मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाल्यानंतर पुणे येथील ते राहात असलेल्या पोलीस ठाणे हद्दीत बिबवेवाडी पोलीस ठाण्याते खात्री केली. त्यांनी सांगितले की, पोलीस ठाणे बिबवेवाडी येथे गुरनं 196/2024 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 137(2) प्रमाणे दाखल आहे. एकाने त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेलेले आहे, अशी माहीती मिळताच तत्या एकास आणि अल्पवयीन मुलगीस एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेऊन आले पुढील तपासकामी बिबवेवाडी पोलीसांच्या ताब्यात दोघांना देण्यात आले आहे.