👉 गेल्या दोन वर्षांमध्ये दलितांवर अत्याचार कमी झाले नाहीत दलितांच्या अन्यायाच्या घटना कमी झाल्या नाहीत.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- सरकार आमचं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आमच्या विचाराचे, फुले-शाहू-आंबेडकरांच्या आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे आणि विचाराने जाणा-या गोरगरिब कष्टक-यांचे हे सरकार महाराष्ट्रात नाही, असे संतप्त प्रतिक्रिया दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.मच्छिंद्र सकटे यांनी देत ते पुढे म्हणाले, तेच सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी दलित महासंघ वाढवून याला पर्याय नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. यामुळेच दलित महासंघाची चळवळ जोरात करण्याचा संकल्प केला असल्याचे अहमदनगर येथे विश्रामगृह येथे महासंघाच्या बैठकीनंतर पञकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी दलित महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे आदिंसह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री सकटे म्हणाले की, दोन वर्षामध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतात अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात पण गेल्या दोन वर्षांमध्ये दलितांवर अत्याचार कमी झाले नाहीत दलितांच्या अन्यायाच्या घटना कमी झाल्या नाहीत. मातंग समाजाचे अण्णाभाऊ महामंडळ गेली सात वर्ष बंद आहे अजित दादांकडे अर्थखाते आहे पण हे महामंडळ अद्यापही चालू नाही हीच परिस्थिती आरटी ची आहे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने पार्टी प्रमाणे आर टी ची स्थापना करावी अशी मागणी राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात केली परंतु दोन वर्षे झाली पण त्याच्यावर साध्या साधी चर्चाही केली नाही अथवा निर्णय घेतला नाही काय चालले आहे हे कळत नाही महाराष्ट्राचा गृहमंत्री बेपत्ता होतात आणि पोलिसांना सापडत नाही. पोलिस आयुक्त बेपत्ता ते ही पोलिसांना सापडत नाही, अशा अवस्थेमध्ये गोरगरिबांचे काय कामे होतील, असा सवाल श्री सकटे यांनी उपस्थित केला.
श्री सकटे पुढे म्हणाले, दलित महासंघ ही सामाजिक संघटना आहे. फुले,शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने काम करते. पण समाजकारण करण ही दलित महासंघाचे मुख्य ध्येय आहे. राजकारणामध्ये आम्ही बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दलित महासंघ, बहुजन समता पार्टीच्या बैठकीत सर्वानुमते येणा-या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा संकल्प आणि निर्णय बहुजन समता पार्टीच्या वतीनं घेतला आहे.
यावेळी श्री रंधवे, कडूबाबा लोंढे, दत्ता वाघमारे, चंद्रकांत सकटे, रफीक शेख, नागेश वायदंडे, मंदाकिनी मेंगाळ, सुलोचना बहीरट, रंगनाथ वायदंडे, संपत गुंड, बबन डोंगरे, किशोर वाघमारे, प्रमोद शेंडगे आदिंसह अहमदनगर जिल्ह्यातील दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.