संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालयाच्या ग्रंथालयास विविध प्रकारचे ५० वाचनाची पुस्तके शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा प्राचार्या सिताताई वामन बडे यांनी नुकतेच भेट दिले आहेत.
श्रीमती बडे या इ.९वी-१९८४-८५ ला विद्यालयात शिक्षण घेत होत्या. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून त्यांनी शाळेला त्यांच्या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयीन ग्रंथालयासाठी विविध प्रकारचे ५० पुस्तके भेट दिली. इ.१०वी मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनीला प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस जाहीर केल आहे. त्या वै.हभप वामनदेव यांच्या कन्या आहेत.
श्रीमती सिता बडे-बांगर अहमदनगर येथील काकासाहेब म्हस्के माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,अहमदनगर. या ठिकाणी प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय घिगे यांनी त्यांचे स्वागत तथा आभार मानले.
✒️संकलन-पत्रकार सोमराज बडे