संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शहरातील प्रभाग क्र. 7 मधील समस्याबाबत महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरसेवक अशोकराव बडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी आयुक्त यांच्याशी आदर्शनगर मधील शिवसेना ऑफीस ते आंबेडकर चौकापर्यंत (600) ची बंद पाईप गटार करणे. आंबेडकर चौक ते गणेश चौक (600) ची बंद पाईप गटार करणे. आरोग्य केंद्राची पाहणी करुण कंपाउंडच्या आतील परिसरात पेव्हिंग ब्लॉक तसेच बसण्यासाठी बाकडे बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. माताजीनगर भागात फेज 2 चे पाणी चालू केले बाबत नागरिकांशी सवांद साधला.
प्रभागातील समस्याबाबत आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली. आदर्शनगरमधील शिवसेना ऑफिस ते आंबेडकर चौकापर्यंतची ड्रेनेज लाईन चोकअप झालेली असून त्यामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. तरी ती ड्रेनेज दुरुस्ती येत्या आठ दिवसात करण्याचे आश्वासन आयुक्त यांनी दिले आहे. तसेच फेज 2 चे पाण्यासाठी व्यंकटेश कॉलनी, अंकुर कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी,गुरुकृपा कॉलनी,ओंकार कॉलनी, विजयनगर, आदर्शनगर, पितळे काॅलनी, नागापूर मधील नागरिकांशी सवांद साधुन 1 महिन्यात फेज 2 पाणी देण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त यांनी दिले आहे