प्रत्येक आमदाराला ‘तुला मंत्री करतो’ म्हणत शिंदे – फडणवीस हे केवळ सरकार टिकवण्याचे काम करत आहे : अजित पवार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी :
आता जर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, तर जे आहे ते सर्व आमदार सोडून जातील, प्रत्येक आमदाराला तुला मंत्री करतो म्हणत, शिंदे – फडणवीस हे केवळ सरकार टिकवण्याचे काम करत आहे, असा घणाघात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी करत ते पुढे म्हणाले, एका मंत्र्यांकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्री पद असल्याचे सध्याच्या सरकारमध्ये दिसून येत आहे. आम्ही आणलेेले कारखाने परराज्यात जात आहे, तिकडे कुणाचे लक्ष नाही, असे श्री पवार यांनी म्हटले.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तथा नेते प्रताप ढाकणे यांच्यावतीने पाथर्डी तालुक्यात आयोजित संवाद यात्रेच्या समोरोपच्या कार्यक्रमाप्रसंगी विरोधीपक्षनेते अजित पवार हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या सुषमा अंधारे, आमदार निलेश लंके, विनायक देशमुख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवानेते ऋषिकेश ढाकणे, जि.प.सदस्य प्रभावती ढाकणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, बाळासाहेब हराळ, घनश्याम शेलार,‌ मा.आ नरेंद्र घुले,उद्धव ठाकरे सेनेचे तालुकाध्यक्ष भगवान दराडे, बाळासाहेब नाहाटा,‌ शिवसेनेचे शशिकांत गाडे, शुभांगी पाटील, योगिता राजळे, युवानेते सिद्देश ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका उपाध्यक्ष उद्धव केदार, नितीन बारगजे आदिंसह शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ॲड प्रताप ढाकणे

ना. पवार पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार पक्षातील पराभवाच्या भीतीने शिंदे- भाजप निवडणुका जाहीर करत नाही असा आरोपही अजित पवारांनी करत ते म्हणाले की, २८ वर्षे आमदार निवडून येणाऱ्या कसब्यात हरले तरी भाजपकडून जोमाने येणार अशी भाषा सुरू आहे. आम्ही देखील येणारी निवडणूक ही डबल जोमानेच लढणार आहोत. मविआ एकत्र निवडणूक लढवेल असे सांगतानाच ज्या पक्षाची मतदारसंघात ताकद असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला देऊन मविआतील मित्र पक्षांनी त्यासाठी काम करायला हवे. तर दुसरीकडे मविआच्या वरिष्ठ पातळीवर जागावाटपाचे सूत्र ठरेल ज्या पक्षाला जी जागा सुटेल त्यासाठी सर्वांनी काम करायला हवे तरच कसब्यासारखा निकाल मिळेल, असेही पवारांनी म्हटले आहे. आम्हाला उमेदवारी नाही दिली आम्ही का काम करावे असे कुणी करू नये अशा सूचनाच अजित पवारांनी पाथर्डीमध्ये मविआच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. मात्र आम्ही चिंचवडसाठी देखील खूप प्रयत्न केले. मात्र तिथे आमचा पराभव झाल्याची खंतही यावेळी त्यांनी उपस्थित केली. तर मविआच्या काळातील कामांना स्थगिती देणे हा रडीचा डाव असल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!