संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाटोदा – ग्रामस्तरावर काम करताना येणा-या समस्या सोडवण्यासाठी महासभा घेण्याच्या नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत 1 ऑगस्ट 2021 रोजी पुणे येथे महासभा घेण्याचे नक्की करण्यात आले आहे.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जयंत पाटील सरपंच परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य होते.सरपंच संघटनेचे पदाधिकारी राज्यातून आलेले सरपंच प्रतिनिधी राज्य संघटनेचे एकनाथ ढाकणे, ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संजीवजी निकम,भास्करराव पेरे पाटील (आदर्शगाव पाटोदे),पुंडलिक पाटील आदर्शगाव पाटोदा ग्रामविकास अधिकारी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यभर ग्रामपंचायतीचे कामकाज करताना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावर उपाय योजना,ग्रामपंचायत उत्पन्नवाढ,कलम 49 रद्द करणे,ग्रामसभेबाबतचे धोरण,व्याज वसुली,मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मध्ये कालबाह्य झालेल्या करावयाच्या सुधारणा,विधान परिषदेवर सरपंच व ग्रामसेवकांना प्रतिनिधित्व,जिल्हा परिषद स्तरावर ग्रामसेवक सरपंच सदस्य नियुक्ती,सरपंच ग्रामसेवक भवनासाठी राज्यस्तरावर तरतूद,जिल्हास्तरावर तरतुदीसाठी मागणी,सरपंच मानधन वाढ,गायरान जमिनीचा हस्तांतरण,एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक,केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना अभियाने,निधी तरतुदी त्याचा होत असलेला वेळोवेळी वेगळ्या पद्धतीचा वापर,अनेक वाद अंकित विषय आहेत की जे सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आणल्या जात आहे.यातून मार्ग काढणे न्यायिक मार्गाचा अवलंब करणे.माननीय मंत्री ग्रामविकास भारत सरकार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनमान्य ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र शासन, सचिव ग्रामविकास महाराष्ट्र शासन यांच्या भेटी घेऊन त्यांना संयुक्तपणे निवेदन देण्याचं धोरण ठरलेले आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कॉमन प्रश्नावर किमान समान कार्यक्रमावर एकत्रित काम करण्याचा नक्की झालेला आहे.पुढील रणनीती ठरवण्यासाठी कॉमन अजिंठा तयार करण्यासाठी 1 ऑगस्ट 2021 रोजी पुणे येथे बैठक घेण्याचे महासभा घेण्याचे नक्की करण्यात आले आहे.
प्रशासकीय सुधारणा ग्रामपंचायत कामकाज अधिकार वाढ कलम 49 मध्ये सुधारणा करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आला आहे.