संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत पालक सभा व शालेय व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीमध्ये शालेय व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक व माता पालक समिती यांची पुनर्रचना करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी परमेश्वर नारायण वाघमारे, उपाध्यक्षपदी बापू मुरलीधर वाघमारे तर शिक्षक पालक समितीच्या अध्यक्षपदी विष्णू श्रीरंग निंबाळकर व माता पालक समितीच्या अध्यक्षपदी सौ.आशा बाळासाहेब शिरसाठ , शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून संपतराव दराडे सर यांची निवडी करण्यात आली.यावेळी सरपंच पांडुरंग शिरसाट, केंद्रप्रमुख श्रीमती आव्हाड मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक श्री तुळशिदास खेडकर सर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी रघुनाथ नाना शिरसाट, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सिताराम शिरसाट सर ,उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट सर ,माजी सरपंच श्री कुंडलिक शिरसाट सर, पोलीस पाटील परमेश्वर वाघमारे, इयत्ता पहिली ते सातवीचे पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.