पिंपरी चिंचवड येथे दि.१९,२० नोव्हेंबरला मराठी पञकार परिषदेचे अधिवेशन

👉अधिवेशनास आष्टी तालुक्यातील पत्रकारांनी उपस्थित रहावे : उपाध्यक्ष अविनाश कदम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
आष्टी‌-
अखिल भारतीय मराठी या पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे पिंपरी चिंचवड येथे दि. १९ व २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. या अधिवेशनास बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सरचिटणीस विलास डोळसे, कार्याध्यक्ष दत्ता अंबेकर, डिजिटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी तसेच विविध डिजिटल मीडियाच्या पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम व आष्टी तालुका डिजिटल मिडीयाचे तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांनी केले आहे.

मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांचा मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जेष्ठ पत्रकार,टि व्ही चॅनलचे ॲकर यांचे मार्गदर्शन होणार आहे याच बरोबर या राष्ट्रीय अधिवेशनात अनेक प्रसिद्ध मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख हे या अधिवेशनात पत्रकारांचे प्रश्न व त्यावरील पुढील दिशा व काहीं ठराव निश्चिती करणार आहेत. प्रत्येक दोन वर्षांनी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होत असते. या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांसाठी एक खास मेजवानी असते. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे हे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन येत्या दि.१९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील शंकरराव गावडे भवन येथे संपन्न होणार आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी सभासदांनी अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, डिजिटल मिडियाचे तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांनी केले आहे.
आष्टीत झालेल्या बैठकीत अधिवेशनात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी निसार शेख,अविशात कुमकर, सय्यद बबलू, जावेद पठाण, यशवंत हंबर्डे, आण्णासाहेब साबळे, किशोर निकाळजे, समीर शेख,अक्षय विधाते, संतोष नागरगोजे, संतोष तांगडे, अशोक मुटकुळे,प्रेम पवळ, गहिनीनाथ पाचबैल, विपुल सदाफुले,अमोल जगताप, शहानवाज पठाण, अतुल जवणे,महादेव वामण,हमजान शेख,दादासाहेब पवळ,कासम शेख,अनिल मोरे,राजू शेख,आदी पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!