पाथर्डी सराफ खूनी हल्ला प्रकरण : तिघे अटक

सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी –
पाथर्डी येथील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांना दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी गंभीर जखमी करून लुटल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी जलदगतीने तपास करत आरोपी विशाल शिवाजी एडके रा.पाथर्डी, दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे या तीन आरोपीना गजाआड केले आहे.

बंडूशेठ चिंतामणी हे गुरुवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान नेहमी प्रमाणे त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी निघाले असता त्यांचा शेवगाव रोड लगत अर्जुना लॉन्स जवळ असलेल्या ओढ्या जवळ अज्ञात चोरट्यांनी दुचाकी गाडी अडवून त्यांच्या कडील पिशवी हिसकावली असता चिंतामणी यांनी त्यास विरोध केला.त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्रांनी चिंतामणी यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले होते. या घटनेने शहरासह तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले होते.
त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करत शुक्रवारी शहरातून पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शंका उपस्थित करण्यात आली होती.
या घटनेचा तपासकामी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आपल्या सहकाऱ्यांसह तालुक्यातील संशयीतावर नजर ठेवली होती.
गोपनीय खबऱ्या मार्फत शहरातील आरोपी विशाल शिवाजी एडके याची गुन्हा घडल्याल्याच्या वेळेदरम्यान संशयित हालचाली बाबत माहिती मिळाली होती.त्यानुसार एडके याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली., मात्र एडके हा सुरवातीस उडवा उडवीचे उत्तरे देत होता.परंतु पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी विशाल एडके याने आरोपी दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे यांच्या मदतीने आपण सराफ चिंतामणी यांच्यावर आठ दिवसापासून पाळत ठेवून संगनमताने चिंतामणी यांना लुटून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,रामेश्वर कायंदे,पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे,पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप,निलेश म्हस्के,संदीप गर्जे,देविदास तांदळे,गरकळ,अतुल शेळके,राहुल निमसे,राहुल तिकोने,संदीप कानडे,,ईश्वर बेरड,लक्ष्मण पवार,ज्ञानेश्वर रसाळ,संदीप बडे, आदीनी सर्व आरोपींना शिताफीने पकडले असून या घटनेचा पुढील अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!