आ. मोनिकाताई राजळेंचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मतदारसंघात व पाथर्डी असलेल्या शेवगाव व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यांतील सर्वच महसूल मंडळांतील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार मोनिका राजळे केली आहे. मागणीचे निवेदन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे.
मतदारसंघात असलेल्या पाथर्डी तालुक्यातील लाख २६ हजार २८५ शेतकऱ्यांनी ५७ हजार ३९५ हेक्टर व शेवगाव तालुक्यातील ९२ हजार ९० शेतकऱ्यांनी ५३ हजार ३७२ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा भरला आहे. दोन्ही तालुक्यांतील सर्व महसूल मंडळांची पीकविमा पंचनाम्यांसाठी निवड होणे गरजेचे असतानाही निवड झाली नाही. सदर निवड ही महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापकाच्या साहाय्याने घेतली आहे. परंतु मंडळ स्तरावर एकच पर्जन्य मापक बसविलेले असते, त्यानुसार त्या मंडळातील २० ते २५ गावांचे पर्जन्यमान धरले जाते, परंतु मंडळातीलअनेक गावांमध्ये पाऊस पडलेला नसतानाही केवळ मंडळ स्तरावरील पर्जन्यमापकाच्या आधारे नोंदलेल्या पावसाचा निकष न लावता, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळांतील पिकांचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचे आहे. पाथर्डी तालुक्यातील सहा मंडळांपैकी फक्त पाथर्डी या एकाच मंडळाचा पीकविमा पंचनाम्यांसाठी समावेश झाला आहे, तर शेवगाव तालुक्यातील शेवगाव, बोधेगाव, एरंडगाव या तीनच मंडळांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यांतील उर्वरित मंडळांचा समावेश करण्यात आला नाही. या सर्वच महसूल मंडळांत कमी पावसामुळे पिकांचे नुकसान आहे. त्यामुळे सर्वच महसूल मंडळांतील पिकांचे पंचनामे होणे गरजेचे आहे.