पाथर्डी शहरात पोलिस प्रशासनाचे संचलन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरामध्ये पाथर्डी पोलीस, सशस्त्र सीमा बलाच्या जवानांसह शेवगाव डिवायएसपी सुनील पाटील, पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एस.एस.बी.चे वरिष्ठ अधिकारी विपीन कुमार व विजय पाल यांच्यासह पथसंचलन करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पाथर्डी शहरातील विविध भागातून हे सशस्त्र पथसंचलन झाले. पाथर्डी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, ३० पोलीस कर्मचारी आणि एस. एस. बी. सशस्त्र सीमा बल या एसआरपीचे १०० जवानांनी शहरातील नगर रोड, नाईक चौक, चिंचपूर रोड, मेन रोड, नवीपेठ, आंबेडकर चौक, कोरडगाव रोड, शेवगाव रोड आदी प्रमुख मार्गावर संचलन केले.
आगामी विधानसभा निवडणुकी दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी. शांतता रहावी. सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षित व भयमुक्त वाटावे तसेच निवडणूकी दरम्यान काळात होणारे सभा, प्रचार, मतदान, मतमोजणी इत्यादी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी या करिता पोलीस प्रशासन सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू न होता, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ, पोलीस कर्मचारी अमोल आव्हाड, सचिन पोटे, सुहास गायकवाड, अमोल लबडे, देविदास तांदळे, प्रकाश बडे, महेश रुईकर, राम सोनवणे, संदीप कानडे आदी सहभागी झाले होते.