संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – येथील पंचायत समितीमध्ये जागतिक माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माहिती अधिकार महासंघाने अहमदनगर जिल्ह्यात जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा, म्हणून मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यलयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दाखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागाला माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत आदेश दिले. त्या आदेशानुसार पंचायत समिती पाथर्डी येथे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शासन पारदर्शक पद्धतीने चालवण्यासाठी माहिती अधिकार कायदा कसा वापरावा व कशा पद्धतीने लोकजागृती करावी. माहिती अधिकार कायद्यातील कलम 1 ते 32 या बाबत राहुल कदम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित गट विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, महिला व बाल विकास अधिकारी श्री दराडे, माहिती अधिकार महासंघाचे राहुल कदम, माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा शैलेंद्र जायभाये, पंचायत समितीच्या जनमाहिती अधिकारी पालवे मॅडम, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी उमेश केकाण, सुभाष केदार व तालुक्यातील ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.