संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – तालुक्यात रेशनिंगचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. याची अँटिकरप्शन ब्युरो तथा सीआयडी विभागामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख विष्णुपंत बाबासाहेब ढाकणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून तालुक्यासह जिल्ह्यात रेशनिंगचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करणारे रॅकेट कार्यरत आहे. यामध्ये अनेक शासकीय अधिकारी ,स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आशिर्वादाने सहभागी आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार च्या अन्न सुरक्षा योजनेद्वारे कोनीही गरीब नागरिक उपाशी राहू नये, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो.
मात्र स्थानिक अधिकारी व यांच्या आशीर्वादाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजर होत आहे. स्थानिक पुरवठा अधिकारी,तसेच स्थानिक पोलीस अधिकारी,तहसीलदार तसेच गावपातळीवर तलाठी,मंडळ अधिकारी,सरपंच,यांना हप्ते देऊन रेशनमाफियानी कोट्यवधींची माया गोळा केली आहे. गावागावात जी यंत्रणा धान्य पोहोच करते तीच यंत्रणा स्थनिक दुकानदाराच्या मदतीने काळाबाजार करणाऱ्या अड्ड्यावर शासकीय गाड्यामधून हे धान्य पोहोच करतात.
त्यामुळे गोरगरीब यापासून वंचित राहतात. याबाबत ढाकणे यानी स्वतः बेलवंडी पोलीस ठाणे श्रीगोंदा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,पाथर्डी पोलीस ठाणे, अहमदनगर यांना संपर्क करून १० ते २० टन गहू व तांदूळ हा गोण्यात भरलेल्या गाड्या पकडून दिल्या होत्या. परंतु लाखो रुपयांची तडजोड करून सदर गाड्या कारवाई नकरता सोडून दिल्या,अशी माहिती यावेळी ढाकणे यांनी पत्रात दिली आहे. संबंधित दोषींवर योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ढाकणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
संकलन : पत्रकार -सोमराज बडे