पाथर्डी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या ११ जागेसाठी ६४ उमेदवारी अर्ज

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी –
तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या निवडणूक निवडणुकीसाठी सरपंच व सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसअखेर ४७८ एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत . सरपंच पदाच्या अकरा जागेसाठी ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले . तर सदस्य पदासाठी एकुण १०९ जागेसाठी ४१४ एवढे अर्ज दाखल झाले आहेत
. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस असल्याने पाथर्डी तहसिल कार्यालयाला शुक्रवारी जत्रेचे स्वरुप आले होते . यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता . दाखल अर्जामध्ये मोहरी सरपंचपदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ३२ अर्ज दाखल झाले आहेत. वडगाव- सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी ३६ ,
सोनोशी सरपंचपदासाठी ११ व सदस्यपदासाठी २५ , कोळसांगवी- सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १७ , निवडुंगे- सरपंचपदासाठी ७ व सदस्य पदासाठी ४१ , भालगाव- सरपंचपदासाठी ८ व सदस्यपदासाठी ७ ९ , वैजु-बाभुळगाव- सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी १४ , कोरडगाव- सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी ३६ , कोल्हार सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी
३१ , तिसगाव- सरपंचपदासाठी ६ व सदस्यपदासाठी ७१ , जिरेवाडी- सरपंच पदासाठी ८ व सदस्यपदासाठी ३२ असे एकुण सरपंच पदाच्या ११ जागेसाठी ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले . सदस्य पदाच्या १० ९ जागेसाठी तब्बल ४१४ एवढे अर्ज दाखल झाले आहेत.
अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
दरम्यान तहसील कार्यालयाला शुक्रवारी एखाद्या जत्रेचे स्वरुप आले होते . तहसीलदार शाम वाडकर , नायब तहसिलदार बागुल आणि गुंजाळ यांच्यासह निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी रात्री उशीरापर्यंत कामकाज करीत होते . ऐनवेळी ऑफलाईन अर्ज स्विकारल्याने ते अर्ज आता ऑनलाईन करण्याची जबाबदारी प्रशासनावर येऊन ठेपली आहे .
👉🏻संकलन-सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!