पाथर्डी तालुका नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा) डॉक्टरांच्या संघटनेची सभा खेळीमेळीत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
सोमराज बडे,
पाथर्डी : पाथर्डी तालुका नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा)या डॉक्टरांच्या संघटनेची सर्वसाधारण सभा श्री धन्वंतरी योग व फर्टिलिटी सेंटर,कसबा पाथर्डी येथे डॉ.नितीन खेडकर व डॉ.मृत्युंजय गर्जे या निवडणूक अधिका-यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत झाली.
नूतन तालुकाध्यक्षपदी डॉ.श्रीधर देशमुख, सचिवपदी डॉ.सचिन गांधी, कोषाध्यक्षपदी डॉ.अमोल शिरसाठ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान तालुका निमा संघटनेच्या वतीने करण्यात आला.
तालुका उपाध्यक्षपदी डॉ.अजय औटी व डॉ.प्रताप वाघ,संघटकपदी डॉ.जगदीश मुने,असिस्टंट सेक्रेटरीपदी डॉ.सतीश शेळके, जॉइंट सेक्रेटरी म्हणून डॉ.सागर भापकर व डॉ.अमोल कोतकर,तर राज्य प्रतिनिधी म्हणून डॉ.सुहास उरणकर व डॉ.अमोल शिरसाठ यांची तर निमाच्या एक्झिक्युटीव्ह कौन्सिलचे सदस्य म्हणून डॉ.नितीन खेडकर,डॉ.मृत्युंजय गर्जे, डॉ.दीपक देशमुख, डॉ.अभय भंडारी व डॉ.दिगंबर भराट यांची निवड करण्यात आली. तालुका निमा संघटनेच्या सर्व सभासदांनी तालुक्यातील सभासद डॉक्टरांचे संघटन, विविध सामाजिक उपक्रम, आरोग्यजागर करणारी व्याख्याने, शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींमध्ये आरोग्य उपक्रम व जागृती, वृक्षारोपण, सॅनिटायझर वाटप,आरोग्यशिबिरे व धन्वंतरीपूजन आदी समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.