संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी:आमदार मोनिका राजळे यांनी आज दि.१४ जून सोमवार रोजी पाथर्डी तहसील कार्यालयात कोविड संदर्भात व भविष्यातील संभाव्य कोरोनाचा संसर्गगाच्या अनुषंगाने विचार विनिमय, उपाय योजना करण्यासाठी आढावा बैठक घेतली.
यावेळी प्रांताधिकारी श्री देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गट विकास अधिकारी शितल खिंडे ,निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक कराळे, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे उपस्थित होते
यावेळी आमदार राजळे म्हणाल्या,संभाव्य रित्या येणाऱ्या तिसऱ्या कोरोनालाटे साठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून लोकांसाठी काम करावे,कोरोनाच्या मागील काळात सर्व प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले असून येणाऱ्या कोरोना लाटेसाठी सतर्क रहा अशा सूचना दिल्या.