संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- शहर व तालुक्यातील सर्व सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या अजंठा चौकाचे फकीर साहेबांविषयी आदरभाव म्हणून सी.डी.फकीर साहेब चौक हे नामकरण परमपूज्य माधवबाबा यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे म्हणाले की,तालुक्यात झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजना व राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचे जनक म्हणून फकीर साहेबांचे नांव आदराने घेतले जाते.फकीर साहेब निवृत्त होण्याच्या अगोदर तीन वर्षे साहेब पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख होते.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा देशात सर्वाधिक निधी महाराष्ट्राला आणून एक विक्रम प्रस्थापित केला होता. प्रा.सुनिल पाखरे यांनी तालुक्यातील सर्व देवस्थानांना जोडणारे रस्ते फकीर साहेबांच्याच प्रयत्नाने झाले.तसेच पाथर्डी तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जावा, यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत मंजूर केला. तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणले असे सांगितले.
यावेळी किसनराव आव्हाड, अॕड. हरीहर गर्जे, मुकुंद गर्जे, नागनाथ गर्जे, प्रा.सुनिल पाखरे, देवा पवार, अक्रम आतार, तन्वीर आतार, हाजी हुमायून आतार, जब्बारभाई आतार, गोरख पवार, अस्लम मणियार, पांडुरंग भिसे, शफीक आतार, रसुल मंडपचे बहादूर आतार, सर्पमित्र फिरोज आतार आदिसह मान्यवर उपस्थित होते.