संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. भाजप प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळाचे १८ व जगदंबा महाविकास आघाडीचे १८ अशी सरळ लढत असली तरी ग्रामपंचायत मतदार संघात आकाश वारे यांचा एकमेव अपक्ष उमेदवारी अर्ज राहिला आहे.
विद्यमान संचालक मंडळातील केवळ तीन संचालकाला पुन्हा उमेदवारी मिळाली. १५ विद्यमान संचालकांना संधी दिली गेली नाही. खासदार डॉ. सुजय विखे पा., आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ शेतकरी मंडळ निवडणूक लढवत आहे. ॲड. प्रतापराव ढाकणे. आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली जगदंबा महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे. बाजार समितीची सत्ता सध्या ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या गटाकडे होती. गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीचा होता. १९० अखेरचा दिवस होता. उमेदवारीपैकी १२३. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. अठरा जागेसाठी ३७ उमेदवार निवडणूक रिगंणात आहेत. निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवारी असे
📥ग्रामपंचायत सर्वसाधारण जागा – शेषराव कचरे किरण राठोड, आदिनाथ बड़े, विकास टेमकर, आकाश वारे
📥अनुसूचित जाती जमाती – रवींद्र आरोळे, शोभा बोर्डे,
📥दुर्बल घटक -नारायण पालवे, सुभाष लाड.
📥व्यापारी व आडते मतदार संघ – प्रशांत मंडलेचा, कुंडलिक आव्हाड, अजितकुमार मेहेर, कैलास गिते.
📥हमाल व मापाडी मतदारसंघ – अशोक सावंत, बाबासाहेब केदार.
📥सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ- अजय रक्ताटे, जगन्नाथ खेडकर, सुभाष बर्डे, वैभव खलाटे, मधुकर देशमुख, नानासाहेब गाडे, शेटे किरण, विठ्ठल बडे, अरविंद देशमुख, निळकंठ आव्हाड, रमेश लवांडे, शिवनाथ हिंगे, भाऊसाहेब गोरे, बाळासाहेब नागरगोजे.
📥विमुक्त भटक्या जमाती – जिजाबा लोंढे, शशिकला सोलाट
📥महिला राखीव -सुनीता कोलते, स्मीता लाड, सुमन ढाळे, विनिता शिरसाट.
📥 इतर मागासवर्ग मतदारसंघ – अरुण रायकर, मंगल या उमेदवारांचा समावेश आहे.
भाजप प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळाला कपबशी हे चित्र मिळाले. तर जगदंबा महाविकास आघाडीला छत्री हे निवडणूक चिन्ह मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील खर्डे यांनी काम पाहिले.