👉 संत भूमी प्रतिष्ठान, स्वर साधना विद्यालयाचा उपक्रम.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – संगीत ही साधना,आराधना आणि पूजा आहे. संगीत धन श्रीमंती देखील आहे. संगीत साधने मुळे प्रत्येक जण अंतर्मुख होतो. त्यातून ताण तणाव कमी होण्यास मदत होते. आनंदाच्या निर्मिती बरोबरच त्यातून प्रसन्नता वाढीस लागते. त्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे प्रत्येकाने संगीताचा आनंद घ्यायलाच हवा असे प्रतिपादनअमोल महाराज सोळसे यांनी केले.
दिवाळी पाडव्यानिमित्त श्री संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठान व सुरत साधना संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मैफिलीला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. गायक. प्रा.जनार्दन बोडखे यांनी सुरुवातीला “ओमकार स्वरूपा”व “विठू माऊली तू माऊली जगाची” या गाण्याला प्रेक्षकांनी वन्स मोअर करत दाद दिली. येथील संत नरहरी महाराज मंदिरात पाडव्याच्या दिवशी सकाळी ही मैफिल रंगली होती. ‘स्वर भावगीत,भक्ती गीत,भजन’ आदी बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाला डॉ. ज्ञानेश्वर दराडे. विश्वस्त मोहटा देवी संंस्थान.,वैभव दहिफळे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष शशिकांत गायकवाड, श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपुर पांगुळचे मुख्याध्यापक कैलास नरोडे,सामाजिक कार्यकर्ते बंडू दानापुरे आदीसह अनेक रसिक उपस्थित होते.
“सुर निरागस हो,बगळ्यांची माळ फुले,या गाण्यांनी मैफिलीला रंगत आणली.हार्मोनियम वर चेतन सोनवणे ,बाबा जायभाये तर तबल्यावर संजय वारे यांनी साथ दिली.मैफल सुमारे दोन तास चालली.
“आली माझ्या घरी ही दिवाळी”,”येशील येशील राणी पहाटे पहाटे,” “माझे माहेर पंढरी,”अबीर गुलाल उधळीत रंग”या गीतांनी मैफिलीत रंगत आणली.हेचि दान देगा देवा तुझा “विसर न व्हावा” या भैरवीने मैत्रीची सांगता झाली पाडव्याच्या दिवशी सकाळी झालेल्या या कार्यक्रमामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर बोडखे स्वागत केले. सुरेखा बोडखे सूत्रसंचालन तर संदीप कराड, शैलेश शिंदे आभार यांनी मानले.
✍संकलन- पत्रकार सोमराज बडे