संग्राम सत्तेचा वृत्तसेवा नेटवर्क
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर (कोंडिराम नेहे) – नगर तालुक्यातील सांडवे येथे पंचायत समिती मा.सभापती इंजि. प्रविणदादा कोकाटे यांच्या स्थानिक विकास निधीतून 27 लाख 8 हजार रुपये किमतीचे गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ मा सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कामामुळे सांडवे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी मा.सरपंच अजय बोरुडे, सरपंच अमोल निक्रड, शिक्षकनेते विष्णुपंत खांदवे, चेअरमन बबन बेंद्रे, बुरहान पाटील,उपसरपंच भाऊ घोलप,शाखाप्रमुख प्रकाश बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक आरु, बाळासाहेब खांदवे, बापूराव खांदवे, गणेश खांदवे, बंडू शेख भाऊराव वाडेकर, बाबासाहेब शेंडकर, शैलेश देवकर, मेजर रमेश खांदवे, वैभव पवार,अरुण रेडेकर, श्रीपती बेंद्रे, पोपट आरु, महेश खांदवे,भाऊसाहेब खांदवे,.सर्जेराव शिंदे, बाळकृष्ण खांदवे, विनायक खांदवे, सचिन बेंद्रे, दिलीप शिंदे, श्रीधर खांदवे, जालिंदर निक्रड, फिरोज शेख, मोसिन शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.