परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी ध्येय मल्टिस्टेट निधी लि. चेअरमनसह ७ संचालकांवर गुन्हा दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेडचे चेअरमनसह ७ संचालकांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा.पंचपीरचावडी, माळीवाडा, अहमदनगर), व्हा.चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा.गुलमोहररोड, सावेडी, अहमदनगर), संचालक व सीईओ राहुरी बबन कराळे (टोकेवाडी,ता.नगर,जि.अहमदनगर),, गणेश कारभारी कराळे (रा.आगडगाव, ता.नगर, जि.अहमदनगर), पूजा विलास रावते, विलास नामदेव रावते ((दोघे,रा.बोरुडेमळा, सावेडी, अहमदनगर) आदींसह एकवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाईपलाईनरोड शाखा शाॅप नं.३ आदित्य अपार्टमेंट, भिस्तबाग, वैदुवाडी अहमदनगर ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड शाखेत रक्कम स्वीकारुन त्याबद्दल्यात मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता. मुद्दल रक्कम मागण्यास गेलो असता, काही दिवस टाळाटाळ केली. दि.१ /१२/२०२३ पासून ध्येय मल्टिस्टेट निधी लि.या पतसंस्थेच्या सर्व शाखा बंद करून चेअरमन व संचालकांनी व इतर साक्षीदार यांची फसवणूक केली आहे, या सौ.सुजाता संदिप नेवसे (रा.शोभा काॅलनी, शिंदे मळा, सावेडी, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं. ६१३/२०२४ भादवि.क ४२०,४०६, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधि.१९९९ कलम ३ व ५ प्रमाणे चेअरमनसह संचालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि.आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पोसई सचिन रणशेवरे हे तपास करीत आहेत.