संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या चिंतन शिविर बैठकीत केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान श्री मोदी यांनी कामकाजात सुधारणा करण्यासाठी 77 मंत्र्यांची 8 गटात विभागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान अशी एकूण 5 सत्रे घेण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू हेही शेवटस बैठकीला उपस्थित होते.
वैयक्तिक दक्षतेपासून संसदीय कामकाजाविषयी सत्र पाच सत्रांमधून पहिला सत्र-वैयक्तिक, दुसरा केंद्रीय क्रियान्वयन, तिसरा मंत्रालय कामकाज आणि हितधारकांसोबत मिळून काम करणे, चौथा- पक्षासोबत ताळमेळ आणि प्रभावी, संवाद आणि पाचवा सत्र- संसदीय कामकाजा विषयी होते.
वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर फोकस केंद्र सरकारची कार्यक्षमता वाढवणे आणि वितरण व्यवस्था मजबूत करणे हा या सर्व बैठकांचा फोकस होता. मंत्र्यांचे 8 स्वतंत्र गट निर्माण करणे हे या दिशेने मोठे पाऊल आहे.
केंद्रीय मंत्र्यांना समूह समन्वयक बनवण्यात आले. प्रत्येक ग्रुपमध्ये 9 ते 10 मंत्री आहेत. एका केंद्रीय मंत्र्याला समूह समन्वयक बनवण्यात आले आहे.
स्मृती ईरानींचा ग्रुप सर्व मंत्रालयांची माहिती देईल. मनसुख मांडविया यांचा गट कार्यालय पाळत ठेवण्यावर भर देणार आहे.हरदीप पुरी लर्निंग ग्रुपचे नेतृत्व करणार आहेत. अनुराग ठाकुर यांचा ग्रुप दुसऱ्यांच्या कामाची समिक्षा करेल. पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली इतर गट तयार करण्यात आले आहेत.
👉ग्रुपला देण्यात आलेले टास्क
👆प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात एक पोर्टल विकसित करणे जे केंद्राच्या प्रमुख योजना आणि धोरणांच्या कामगिरीचे अपडेट देईल.
👆संबंधित मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांवर लक्ष ठेवण्यासाठी डॅशबोर्ड असेल.
👆बैठकांचे वेळापत्रक आणि पत्रव्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी एक प्रणाली असेल.
👆सर्व जिल्ह्यांची, राज्यांची आणि मंत्रालयांची प्रोफाइल तयार करण्याचे काम मंत्र्यांना देण्यात आले आहे.
👆एका गटासाठी किमान तीन तरुण व्यावसायिकांचा संघ असावा यासाठी यंत्रणा उभारण्याची जबाबदारी.
👆या यंग प्रोफेशनल्सचे रिसर्च, कम्युनिकेशन आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर प्रभुत्व असायला हवे.