👉मोठ्या फरकाने निवडून येत कुनाल खताळ यांचा अंदाज खरा ठरला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: सकाळ”माध्यम समूह आयोजित “यिन” नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निवडणुकीत नगर येथील न्यू लाँ काँलेज येथे यिन साठी शनिवार दि. 28 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंत मतदान झाले.अध्यक्ष म्हणून माधव दुसूंगे याची निवड झाली. माधव यास सर्वाधिक 122 मते मिळाली, तर उपाध्यक्षपदी ओमकार काटे याची निवड झाली, त्यास 114 मते मिळाली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने यिनच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावर निवडणूक घेण्यात आली. न्यू लाँ काँलेज मध्ये प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.मतदान प्रक्रियेला प्रारंभ होण्यापूर्वीच मतदाराच्या रांगा लागल्या होत्या.दुपारी मतदानाची मुदत संपल्यानंतर सातही उमेदवारांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी यांनी मतमोजणी करून उमेदवारांना पडलेले मतदान घोषित करून अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडीची घोषणा केली.
घोषणे नंतर माधव दुसूंगे साठी कुणाल खताळ,रविंद्र ठवरे,प्रसाद बेद्रे,अमर निमसे, हेमंत पालवे, अनिकेत जाधव,ऋषीकेश थोरात,सुदर्शन चौधरी, उत्कर्ष लुटे,अफ्रोज जहांगीरदार,वैभव पालवे,अनुष्का सहस्त्रबुद्धे,तेजश्री मदने, प्रगती खरमाळे आदी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात चांगल्या पद्धतीने प्रचार केला व विद्यालयात सर्वसमावेशक आणि सर्वमान्य उमेदवार म्हणून माधव दुसूंगे यास निवडून आनले त्याच्या निवडीणे काँलेज मध्ये विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला.