संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली : नीट यूजी परीक्षा 2024 परीक्षेतील अनेक कथित गैरप्रकारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयाने सोमवारी सुनावणीस सुरुवात केली. या परीक्षेत झालेले एकूणच गैरप्रकार पाहता, कोणत्या परिस्थितीत फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागतील, हे देखील न्यायालयाने सांगितले.
अंडरग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट यूजी परीक्षा 2024 में कथितरित्या अनेक गैरप्रकार झाल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांवर सोमवार दि.8 जुलै रोजी सुनावणी घेण्यात आली. ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणारी याचिका देखील यात आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जेबी पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर या याचिकांची सुनावणी झाली. कोणत्या परिस्थितीत पुन्हा परीक्षा घेतली जाऊ शकते, हे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या दिवशी फुटत असेल, ती समाज माध्यमांच्या साहाय्याने व्हायरल केली जात असेल, तर परीक्षा पुन्हा घेणे आवश्यक आहे. कारण, अशा गोष्टींमुळे परीक्षेचे, परीक्षा पद्धतीचे पावित्र्य नष्ट होते. या परीक्षेपुरतं बोलायचं झालं तर, जर तुम्ही दोषी आणि निर्दोष व्यक्तींना वेगळं करू शकत नाही, तर परीक्षा पुन्हा घेणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो. टेलिग्राम, व्हॉट्सऍप आणि अन्य माध्यमातून जर प्रश्नपत्रिका फुटली असेल तर याचाच अर्थ ती फार वेगाने परीक्षार्थींना मिळाली आहे. म्हणजेच पेपर फुटला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्या. जेबी पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांनी सुनावणीदरम्यान म्हटले. जर परीक्षेचे पावित्र्य धोक्यात आले असेल, तर पुन्हा परीक्षा घ्यावी लागेल. जर दोषी लोकांना आपण पकडू शकलो नाही, तर परीक्षा परत घ्यावी लागेल. हे सांगतानाच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काय करावे लागेल, तसेच छएएढ परीक्षेचे पावित्र्य कशा पद्धतीने जपता येईल, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.