नाशिक आयजी, नगर एसपी‌ साहेब पाथर्डीतील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली ; पुन्हा बंदुकीतून एकावर गोळ्या झाडल्या

नाशिक आयजी, नगर एसपी‌ साहेब पाथर्डीतील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली ; पुन्हा बंदुकीतून एकावर गोळ्या झाडल्या
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : यापूर्वी घडलेल्या खूनासारख्या घटनांमध्ये पाथर्डी पोलिसांनी कोणताही सखोल तपास न केल्याने येळी या गावातीलच आरोपी हे जामीनावर बाहेर आले आहे. यामुळे येळीसह पाथर्डी तालुक्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याला फक्त पोलिस प्रशासन जबाबदार असून, यामुळे पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, अनेक दिवसांपासून ठाण मांडून असणा-या पोलिस कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी एसपी राकेश ओला यांच्याकडे तक्रारीही केल्या आहेत. तरीही पाथर्डी पोलिस ठाण्यातील गलथान कारभाराकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यामुळे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षकांनी जातीने अहमदनगर जिल्ह्यातील विशेषात पाथर्डी पोलिस ठाण्याचा मागील वर्षापासूनचा अहवाल पाहिला पाहिजे. यात गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येईल. यातच पुन्हा पाथर्डी तालुक्यात बंदुकीतून एकास गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला आहे. या सर्व घटना पाहता नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यातील कार्यपद्धतीवर बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.


पाथर्डी पोलिसांच्या हाताबाहेर गुन्हेगारी गेली आहे. बुधवारी (दि.२६ जून २०२४) पुन्हा पाथर्डी तालुक्यातील सैदापूर (हत्राळ) गावामध्ये नातेसंबधाच्या वैमनस्यातून माणिक सुखदेव केदार यांच्यावर रिव्हालवरमधून दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी लागून केदार हे जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले. ही घटना बुधवार दि. २६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान ही घडना घडली. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण पाथर्डी तालुका हादरला आहे.
पोलीस सूत्राकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील येळी येथील सुभाष विष्णू बडे (रा.येळी, ता.पाथर्डी) याचा विवाह झाला होतो. ८ वर्षानंतर त्याचा पत्नीबरोबर घटस्फोट झाला होता. यानंतर घटस्फोटीत त्या महिलेने सैदापूर (हत्राळ) येथील एका युवकाशी विवाह केला होता. या घटनेचा मनात राग ठेवून आरोपी सुभाष बडे यांनी बुधवारी सायंकाळी सैदापूर (हत्राळ) येथील केदार वस्तीवर जाऊन कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला. बंदुकीने गोळी मारुन माणिक केदार याला जखमी केले.
या दरम्यान केदार याला छातीच्या खालच्या भागांमध्ये गोळी लागली असून त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्याला नगर येथे हलवण्यात आले आहे. सैदापूर (हत्राळ) येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुभाष बडे याला जमावाने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला आहे.
घटनेची माहिती समजतात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सचिन लिमकर हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. तेथे सुभाष बडे याला ग्रामस्थांनी बांधून ठेवलेले होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत घटनास्थळावरून एक पिस्टल, कोयता जप्त केला आहे.
जखमी माणिक केदार यांना नगरला हलवल्यानंतर सुभाष बडे याला देखील पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नगर येथे हलविले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!