संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शहरातील क्र,7 मधील नागापूर आरोग्यकेंद्र, संतराम नागरगोजे सांस्कृतिक भवन, नागापूर गावातील जुने आरोग्यकेंद्राची महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सभागृहनेते अशोकराव बडे, आयुक्त शंकर गोरे यांच्यासमवेत पाहणी केली.
यावेळी प्रभाग क्र.७ मध्ये पाहणी करताना प्रभागातील येणा-यां समस्याकडेही महापौर शेंडगे याचे सभागृहनेते अशोकराव बडे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, नागरिकांनी महापौर व आयुक्तांना समस्या सोडवण्याची मागणी केली.
यावेळी महापालिकेचे शहरअभियंता सुरेश इथापे , टाऊन प्लॅनिंगचे श्री चारठाणकर, श्री बल्लाळ, इंजि पारखे, विद्युत विभागाचे इंजि तिवारी, श्री ठोंबे, प्रभाग अधिकारी सारसर , नगरसेविका सौ कमलताई सप्रे, नगरसेवक मदन आढाव, भागचंदमामा भाकरे, लोभाशेठ कातोरे, पंढरीनाथ सप्रे, आकाश कातोरे, बबन कोतकर,श्री,दिलीप पेटकर,श्री शिरसाठ साहेब, श्री,पाखरेसर, योगेश गायकवाड, श्री भागवत, श्री,बेलदार, श्री विकी सप्रे आदिंसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.