नागरिकांना गुणवत्तापूर्ण, अधिक गतीमान व सुलभरितीने सेवा द्याव्यात – पालकसचिव प्रवीण दराडे

नागरिकांना गुणवत्तापूर्ण, अधिक गतीमान व सुलभरितीने सेवा द्याव्यात – पालकसचिव प्रवीण दराडे
जिल्ह्याच्या विविध उपक्रमांचे कौतुक; देशाला दिशादर्शक ठरणारे काम करण्याच्या सूचना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर- शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण,अधिक गतीमान व सुलभरितीने सेवा देत जिल्हा देशासाठी दिशादर्शक ठरावा यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना सहकार, पणन व वस्द्योत्रोग विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव प्रविण दराडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात १०० दिवस कृती आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीमध्ये पालकसचिव श्री.दराडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
पालकसचिव श्री. दराडे म्हणाले, मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरामध्ये १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. आराखड्यानूसार जिल्ह्यात समाधानकारक काम करण्यात येत असले तरी यापेक्षा अधिक उत्तम काम करण्याची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये क्षमता आहे. बदल हीच कायमस्वरुपी बाब असल्याने प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी होणाऱ्या नवनवीन बदलांचा स्वीकारत करत नाविन्यपूर्ण व कल्पकतेमधून उपक्रम राबवून आपले कार्यालय व जिल्हा आदर्श होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न त्यांच्या जिल्ह्यातच सुटावेत त्यांना मंत्रालयात येण्याची गरज भासू नये याबाबीवर मुख्यमंत्र्यांचा भर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी नेमण्यात आलेल्या पालक अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर ग्रामीण व तालुकापातळीवरील अधिकाऱ्यांना सहभागी करुन घेत नागरिकांच्या बैठका घ्याव्यात. या बैठकांमधून त्यांच्या प्रश्नांची जागेवर सोडवणूक कशी करता येईल, यावर अधिक भर देण्यात यावा.
जिल्ह्यात अनेकविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ही कामे करत असताना ती विहित वेळेत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार झाली पाहिजेत. प्रकल्प पुर्णत्वास नेण्यात अडचणी येत असल्यास त्यांची माहिती पाठविण्यात यावी. राज्यस्तरावर पाठपुरावा करुन ही प्रकरणे मार्गी लावण्यात येतील. जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे उपक्रम इतर जिल्ह्यात राबविण्यासाठीही प्रस्तावित करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा प्रशासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यात नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी १ लाख दाखले वाटप, ३०० शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करणे, दरखास्त ताबा प्रकरणे निकाली काढणे तसेच अभिनव उपक्रमांमध्ये सेवादूत, जलदूत, जीवन प्रमाणम, एआय चॅटबोट, ई-प्रकल्प आदींचा समावेश होता.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह विभाग प्रमुखांनी १०० दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती पॉवर प्रेंझेंटेशनच्या माध्यमातून दिली.
बैठकीस सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कॉपीमुक्तीसाठी वॉररूमसारखे उपक्रम उपयुक्त
जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त , भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या वॉररुमला पालकसचिव प्रवीण दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली. वॉररुमसारखे उपक्रम कॉपीमुक्तीसाठी उपयुक्त असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!