रेणुकामाता कन्स्ट्रक्शन व सचिनभाऊ सुसे मित्रमंडळ यांच्यावतीने कार्यक्रम ः महाप्रसादाचे वाटप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः रेणुकामाता कन्स्ट्रक्शन व सचिनभाऊ सुसे मित्रमंडळ यांच्या वतीने नागरदेवळे गोेंधळेमळा (भिंगार) येथील रेणुकामाता मंदिराचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन झाले. या कीर्तनामध्ये बाळू महाराज गिरगावकर यांनी उपस्थितीत भक्तगणांचे सरळ व सोप्या भाषेत दाखले देत, समाजप्रबोधनपर कीर्तन केले. कार्यक्रमास नागरदेवळे, बुर्हाणनगर, कापरवाडी, वडारवाडी पंचकोशीतील व नगर शहरातील भक्तगण मोठ्या संख्येने कीर्तन कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे भक्तगणांना मोठ्या संख्येने वाटप करण्यात आले. कार्यक्रमास अहिल्यानगर भाजपाचे उपाध्यक्ष तथा युवानेते अक्षय कर्डिले, मा.सरपंच राम पानमळकर, नगर शहर राष्ट्रवादीचे प्रा.माणिकराव विधाते,मा.जि.प.सदस्य शरदभाऊ झोडगे, युवानेते महेशशेठ झोडगे, राकेश ताठे, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य श्री.मा.गोेंधळे आदींसह मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.