नाकाबंदीत पावणेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त ; नगर शहर वाहतूक शाखा व तोफखाना पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : शहरामध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन व नाकाबंदीसाठी चौकाचौकात पोलीस अधिकारी व अंमलदार नेमणूक केली जात असते, या दरम्यान गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने ती टेम्पोसही पकडण्यात आला, असा एकूण ११ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल करुन जप्त करण्याची कारवाई तोफखाना पोलीस व शहर वाहतूक शाखेच्या संयुक्तपणे करण्यात आली.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहर वाहतूक शाखेचे पोनि बाबासाहेब बोरसे यांच्या सूचनेनुसार पोसई शमुवेल गायकवाड, सफौ मन्सुर सय्यद, पोकाॅ युवराज गव्हाणे, पोशि मधुकर ससे, चापोशि अतुल लगड आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे पोहवा विनोद गंगावणे, पोहवा दीपक जाधव, पोकाॅ सचिन बाचकर, पोकाॅ सावळेराम क्षिरसागर आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी शहर वाहतूक शाखेमार्फत कोठला बसस्थानक अहमदनगर या ठिकाणी नाकाबंदी सुरू होती. या दरम्यान नगर शहर वाहतूक शाखेचे पोनि बाबासाहेब बोरसे यांना माहिती मिळाली की, नगर शहरातील कोठला, मंगलगेट या ठिकाणी महाराष्ट्रातून कोठूनतरी गोवंश जातीची जनावरे कत्तल करुन मांस विक्री करण्याचे उद्देशाने जनावरांना मालवाहतूक वाहनातून डांबून ठेवून चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता छ. संभाजीनगर रोडने घेऊन येत आहेत. अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वा. शिरुर बाजूकडून कोठला बसस्थानक दिशेने येणारी चार संशयित मालवाहतूक वाहने दिसली. वाहने थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिल्याने वाहनांची तपासणी केली. यावेळी त्यामध्ये ५ काळया रंगाच्य जर्शी गायी, गोवंश जातीची ६१ लहान-मोठी जर्शी वासरे मिळून आली. वाहन चालकांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वसीम इसाक सय्यद (रा. खाटीकगल्ली, अहमदनगर) महेंद्रा पिकअप (क्र. एमएच. १७ एजी. ३२५१), आतिक लतीफ कुरेशी (रा. राहुरी, अहमदनगर (महेंद्रा पिकअप क्र. एमएच.०१ एल.ए.३४२३), सुलतान एनुद्दीन कुरेशी (रा. इस्लामुपुरा मदारी वस्ती, शिरुर जि.पुणे ) महींद्रा पिकअप (क्र. एमएच.४२ एम. २९७८), जमील अब्दुल सय्यद रा. कोठला, घासगल्ली, अहमदनगर) सुझुकी कंपनीची (कॅरी-विना नंबरची) अशी असल्याचे समजले.
या सर्वांकडून एकूण ११ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम. ११, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब), ९ मोटार वाहन कायदा कलम.६६ (१), १९२,१५८/१७७ प्रमाणे सफौ मन्सुर सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना ठाण्याचे पोना व्ही.सी. गंगावणे हे करित आहेत.