संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर- नगर-शिर्डी रस्ता कामात सरसपणे लोकप्रतिनिधीने ‘त्या’ ठेकेदारास बोलावून टक्केवारीची मागणी केली. ठेकेदाराकडे पैशांची मागणी केल्या कारणाने त्या ठेकेदाराने हतबल होऊन नगर-शिर्डी रस्ता काम थांबवण्यासाठी नोटीस दिली आहे, खासदार डाॅ सुजय विखे पा यांनी अहमदनगर येथे पञकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, ओबीसीचे सेलचे किशोरराव डागवाले आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
खा.विखे पा पुढे म्हणाले की, मी कुठल्याही लोकप्रतिनिधीचे,मंञी,जि.प.सदस्याचे नाव घेतले नाही, तसे माझे वाक्य नाही.मी फक्त लोकप्रतिनिधी म्हटले आहे. एवढी प्रकल्प सुरु असताना या एकमेव प्रकल्पाला अशा पद्धतीने अडथळे करण्याचे काम झाले आहे.