संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात हजारो लिटर पाणी गटारीत ; पाईपलाईन दुरस्ती आवश्यक या मथळ्याखाली ‘नगर रिपोर्टर’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यांची जिल्हा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, फुटलेल्या पाईपलाईनचे दुरुस्ती कामकाज शनिवारी (दि.13) सुरु केले आहे. या पाईपलाईन दुरूस्तीमुळे मुळाडॅम येथून कोट्यवधी रुपये खर्चून आणलेले पाणी गटारीत जाऊन वाया पाण्यापासून थांबणार आहे. तात्काळ दुरुस्ती कामकाजास सुरूवात झाल्याने सामाजिक संघटनांनी व पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी ‘नगर रिपोर्टर’ धन्यवाद दिले आहेत.