संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः 7 वा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी नगर महानगरपालिका कामगार युनियनचे पदाधिकार्यांनी महानगरपालिकाच्या कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
केंद्र शासनाने दि.1 जानेवारी 2016 पासून केंद्रीय कर्मचार्यांना 7 वेतन आयोगाचे लाभ सुरू केले. राज्य शासनाने केंद्र शासनाने लागू केलेला सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी जश्याच्या तशा स्वीकृत करून राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना दि.1 जानेवारी 2026 शिफारसी लागू केल्या केल्या.
अहमदनगर महापालिका सभा ठराव क्रमांक 12 दि.16 जुलै 2019 पारित करून महानगरपालिकेतील कर्मचार्यांना 7 वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकृत करून नगर महानगरपालिकेतील कर्मचारी व पदाधिकारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने स्वीकृत करून नगर महानगरपालिकेतील कायम कर्मचार्यांना 7 वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता दिली. प्रस्तावास अंतिम मान्यता मिळणे कामी महानगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला राज्य शासनाने नगर महानगरपालिकेचा आस्थापना खर्च जास्त असले बाबत त्रुटी काढून उत्पन्न वाढीबाबत उपाय योजनेबाबत माहिती मागवली महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीबाबत उपाययोजनासह प्रस्ताव पुन्हा राज्य शासनाकडे पाठविला तदनंतर राज्य शासनाने वारंवार त्रुटी काढून महापालिका प्रशासनाकडून दुरुस्ती करून प्रस्ताव सादर करणे कळविले त्या अनुसरून महापालिका प्रशासनाने वारंवार पूर्तता केलेली आहे वास्तविक पाहता नगर महानगरपालिकेपेक्षा कमी उत्पन्न असणारे व आस्थापना खर्च जास्त असणार्या महापालिकेस राज्य शासनाने सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू केले आहेत नगर महापालिका कामगार युनियन पदाधिकारी यांनी सदर मागणीसाठी राज्य शासनाचे नगर विकास विभाग महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक पदाधिक पदाधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र सदर कामी शहरातील काही मोजक्याच पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले मात्र तरी देखील राज्य शासनाने महापालिकेस सातवा वेतन आयोग लागू केला नाही त्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचार्यांच्या मागणीनुसार नगर महानगरपालिका युनियन चे पदाधिकारी यांनी राज्य शासनाला जाग येण्यासाठी महापालिकेतील सर्व कर्मचारी सोबत घेऊन दि.2 डिसेंबर 2023 रोजी नगर ते मंत्रालय मुंबई असा पायी लॉन्ग मार्च काढण्यात आला कामगारांचा लॉग मार्च दि.4 डिसेंबर 2023 भाळवणी (ता. पारनेर) येथे पोहोचला असता राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने महापालिका कामगार युनियन यांना पत्र देऊन मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित केल्याबाबत कळवून लॉग मार्क स्थगित करण्याबाबत कळविले. मात्र काही कारणास्तव बैठक रद्द झाली तदनंतर अद्यापपर्यंत पुन्हा बैठक आयोजित केली नाही व 7 व्या वेतन आयोगाचा निर्णय देखील घेतलेला नाही त्यामुळे नगर महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, कार्याध्यक्ष बाळासाहेब मुदगल, बाळासाहेब राशिनकर, आनंदराव वायकर, नंदकुमार नेमाने, राहल साबळे, बलराज गायकवाड, सागर साळुंखे, अजय सौंदे, प्रफुल्ल लोंढे, अजित तारु, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, अखिल सय्यद, सखाराम पवार, महादेव कोतकर, अमोल लहारे, दीपक मोहिते, नागनाथ पवले, वसंत थोरात, अन्वर शेख, सुनील चाफे, महेश लहारे, वैभव जोशी, परीक्षेत बिडकर, गणेश लयचेट्टी तसेच महानगरपालिकेतील कर्मचारी महानगरपालिकेसमोरील आमरण उपोषणात सहभागी असल्याविषयी कॉमेड अनिल भोसले यांनी सांगितले