संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर अहमदनगर एलसीबी टिम’ने छापे टाकण्यात आली. या छाप्यात एका महिलेसह ६ जणांविरुद्ध कारवाई करुन तब्बल १ लाख ९२ रुपयांच्या गावठी हातभट्टीची साधने, कच्चे रसायन व तयार दारु नष्ट करण्यात आली.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे व नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ बबन मखरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, पोकॉ मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, रोहिदास नवगिरे, मपोना भाग्यश्री भिटे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या ‘टिम’ने कारवाई केली.
नगर तालुका पोलिस ठाण्यात अशोक ईश्वर पवार (रा. खडकी, ता. नगर), रविंद्र ईश्वर पवार (रा. खडकी, ता. नगर), रौफ मेहबुब सय्यद (रा. नेप्ती, ता. नगर), भरत माणिक पवार ( रा. नेप्ती, ता. नगर) तर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नवनाथ लक्ष्मण लोणारे (रा. कासारमळा, कापुरवाडी, ता. नगर), एक महिला आदि सहाजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी एलसीबी टिम नेमून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने टिममधील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि.१० ते दि.१२ फेब्रुवारी दरम्यान कारवाईची विशेष मोहिम राबवून ६ ठिकाणी छापे टाकण्यात आली. यात १ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ३ हजार ४००लि. कच्चे रसायन, २२० लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त व नष्ट करण्यात आली. या कारवाईत ६ आरोपींविरुध्द नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.