संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर छापे टाकून ४४ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ राहुल शिंदे, पोकाॅ कमलेश पाथरुट, पोकाॅ संदीप जाधव, पोकाॅ खिळे, चपोहेकॉ इथापे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

नगर तालुका हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार वाटेफळ गावच्या शिवारात निसर्ग हॉटेल येथे, रुईछत्तीसी गावामध्ये हॉर्टल दिपाली येथे छापे टाकले, यात सचिन अशोक भवर (वय ३३ रा. वाटेफळ ता. जि. अ.नगर) याला ताब्यात घेतले. त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जेमध्ये ५ हजार १७५ रुपयांच्या विविध कंपनीच्या देशी व विदेश दारुच्या बाटल्या मिळून आल्या.
हॉटेल दिपाली येथे सोमनाथ सुनिल जगदाळे (वय २३ वर्षे रा. रुईछत्तीसी ता. जि. अ.नगर) याला ताब्यात घेतले, त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात ४ हजार ६५०/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. निमगांव वाघा गावच्या शिवारात गेले असता तेथे एका घराच्या आडोशाला एक गावठी हातभट्टीचे रसायन व तयार हातभट्टीचा ३४ हजार ५०० मुद्देमाल असा एकूण ४४ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.