संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर: जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नगर तालक्यातील खारेकर्जुने येथे विविध विकास कामांचा शुभारंभ उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके, मयूर निमसे , रामेश्वर निमसे, अभिजित निमसे, सौरभ निमसे, स्वप्निल तांबे, प्रभाकर मगर, सचिन शेळके, प्रदीप गाडेकर,अशोक निमसे, गोकुळ दास निमसे, प्रकाश लांडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी श्री शेळके म्हणाले की, ग्रामीण भागातील गावांमध्ये दळणवळणासाठी रस्ते व्यवस्थित असणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध योजनांमधून रस्त्यांचे कामे येणाऱ्या काळात पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या जन सुविधेच्या योजनेअंतर्गत गावातील मुस्लिम स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार आहे. त्याच प्रमाने स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमसे यांनी केले. प्रकाश लांडे यांनी आभार मानले.
यात विकास कामे याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना 2020-21 अंतर्गत खारेकर्जुने ते गोकुळवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजित रक्कम 30 लाख, जिल्हा वार्षिक योजना 2020-21 अंतर्गत खारेकर्जुने ते गोकुळवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजित रक्कम 25 लाख, 15 वा वित्त आयोगातून खारेकर्जुने येथील ग्रामपंचायत ऑफिस ते भाऊमामा लांडे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे अंदाजित रक्कम 12 लाख, खारेकर्जुने येथील ग्रामपंचायत ऑफिस ते आगलावे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे अंदाजित रक्कम 13 लाख,
जिल्हा परिषद जन सुविधा योजना अंतर्गत कर्जुनेखारे (ता. नगर) येथील मुस्लिम स्मशानभूमी चा विकास करणे अंदाजित रक्कम 10 लाख, जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत खारे कर्जूने येथील स्मशानभूमीचा सुशोभिकरण करणे अंदाजित रक्कम 10 लाख रुपयांच्या निधी मिळाला आहे.