संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
जामखेड – नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृती रथयात्रेच्या सोबत आपण असून, या विषयासाठी तुमच्यासोबत असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे. .यासंदर्भात नामांतर कृती समितीच्या वतीने जनजागृती करण्यासाठी १२ दिवसांच्या जिल्हास्तरीय रथयात्रेचा शुभारंभ अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चोंडी येथे झाला. यावेळी आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते.
यावेळी रथयात्रेचे उदघाटन श्रीक्षेत्र गुरुदेव देवस्थान पट्टणकलोडीचे (जि. कोल्हापूर ) मुख्य मानकरी व भाकणूककार खेलोबा राजाभाऊ वाघमोडे उर्फ फरांदे महाराज यांच्या हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोटे – देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी नामांतर कृती समितीचे विजय तमनर , चोंडीचे अक्षय शिंदे , चोंडीचे सरपंच सुनील उबाळे,अविनाश शिंदे, सचिन डफळ, निशांत दातीर,राजेंद्र तागड, अक्षय भांड, दत्तात्रय खेडेकर अशोक होनमाने विनोद पाचरणे,संदीप भांड, यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार पवार म्हणाले, ,नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली . ही मागणी कोणा एकाची नसून, सर्वांनी अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या इतकी कार्यकुशलता असलेली व्यक्तीमत्व नाही. पुढील काळात ही मागणी विधान परिषदेत आली तर नक्कीच सहभागी होणार आहे.तसेच चोंडी येथिल विकास कामांना प्राधान्य देत ९ कोटी रुपयांची नव्याने कामे करणार आहे.असे त्यांनी सांगितले.
विजय तमनर म्हणाले , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमापुर्वी नामांतर झाले नाही. तर जयंती कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला. आगामी अधिवेशनदरम्यान हा मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.