अहमदनगर जिल्हा पोलिस यंञणेकडे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्ह्यात चोरट्यांकडून बॅंका, पतसंस्था चोरीसाठी टर्गेट केले जात नाही हे ना, असे दोन दिवसांपूर्वी सोनई व संगमनेर पोलिस ठाणे हद्दीतील घटनेवरून दिसत आहे. तर दुसरीकडे दुचाकी चोरीचे प्रमाणही वाढल्याचे एकंदरीत नगर जिल्ह्यात दररोजच्या घटनांवरून दिसत आहे. यामुळे सध्याची राजकीय घडामोडी पहात कायदासुव्यवस्थेसह या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे एकप्रकारे जिल्हा पोलिस यंञणेला आवाहनच दिसते आहे.
नेवासा तालुक्यातील सोनई पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी (दि.२) बॅंक ऑफ बडोदा शाखा घोडेगाव या बॅंकेच्या उत्तरेकडील भिंतीच्या खिडकीचे दोन गज चोरट्यांनी कापून व वाकावून आत बॅंकेत घुसले. यावेळी चोरट्यांनी बॅंकेची पैशाची तिजोरी व दागिण्याचे लाॅकरचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, या बॅंक ऑफ बडोदा चे अधिकारी सचिन शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात २५४/२०२२ भादंवि कलम ४५७,३८०,५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तर संगमनेर शहर पोलिस ठाणे हद्दीत विजय नागरी पंतसंस्थेचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत पतसंस्थेचा दरवाजाचे शेटर तोडण्याचा प्रयत्न करताच सायरन वाजल्यावर चोरटे पळून गेले, या योगेश उपासणे (रा.कामगार सोसायटी, गुंजाळवाडी ता.संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून ५१६/२०२२ भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात आठवड्यातून २ ते ४ दुचाकी चोरी जात आहे. या घटनांवरून दुचाकी चोरटे चांगलेच सक्रिय झाले की असे वाटत आहे. यामुळे जिल्हा पोलिस यंञणेला या चोरट्यांचा चांगलच बंदोबस्त करावा लागणार आहे. नाहीतर या चोरट्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा ञास सहन करावा लागले. यामुळे अनेक नागरिकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.