संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एकास आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) मोबाईलवरुन घेणारा पोलिसांनी पकडला. त्याच्याकडून १३ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
साजिद उस्मान पठाण ( वय ३२, रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोहेकॉ मनोहर गोसावी, संदीप पवार, पोना सचिन आडबल, पोकॉ शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अवैध धंद्यांची माहिती घेत असताना एलसीबी पोनि श्री आहेर यांना माहिती मिळाली. ती माहिती एलसीबी टिम’ला देण्यात आली. माळीचिंचोरा (ता. नेवासा) येथे साजिद पठाण हा माळी चिंचोरा फाटा ( ता. नेवासा )येथे उघडयावर बसून त्याच्या मोबाईलवर ऑनलाईन साईटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन सट्टा खेळताना व वहीमध्ये आकडेमोड करताना दिसला. एलसीबी टिम’ला खात्री होताच त्यास जागीच पकडले. पोलीसांनी त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव साजिद उस्मान पठाण ( रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्याच्या हातातील वही व मोबाईलची पाहाणी केली असता, त्याच्या मोबाईल फोनमध्ये आयपीएल किकेट मॅचवर सट्टा लावून गेम खेळत असल्याचे दिसले. त्याच्या हातातील वही व मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. यानंतर त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली, यात १३ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनी ऍ़न्ड्रॉईड मोबाईल, रोख रक्कम व आकडेमोड केलेली वही मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. याप्रकरणी एलसीबी पोना सचिन दत्तात्रय आडबल यांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ाा ४८१/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई नेवासा पोलीस करीत आहे.