नगरात विनापरवाना ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार अड्डयावर आयजीच्या पथकाची धडक छापेमारी ; १५ जणांवर गुन्हे दाखल

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर
– शहरात सुरु असलेल्या विनापरवाना ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार अड्डयावर आयजीच्या पथकाने धडक छापेमारी केली. या छाप्यामध्ये एकूण १५ जणांविरुध्द नगर शहरातील पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ चे कलम ४ व ५ सह लॉटरी (विनियमन) अधिनियम १९९८ चे कलम ७ (३), ९(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आयजी पथकाने एकूण १ लाख ४० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहरात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे जुगार सुरु असताना फक्त आयजी पथक ठराविक ठिकाणी सुरु असणा-या जुगार अड्डयावरच छापे का टाकले जातात ?, या छापेमारीनंतर नागरिकांमधून सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी पोनि बापू रोहोम, सपोनि सचिन जाधव व पोह शेख शकील अहमद, पोह सचिन दिलीप धारणकर, पोना कुणाल सुरेश मराठे, पोना प्रमोद मंडलिक आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणूक केलेल्या पथकाने दि.४ जुलै २०२२ रोजी ज्ञानेश्वर वसंतराव तनपुरे (वय ४८, तपोवन रोड साई नगर ता. जि. अहमदनगर), संतोष गुलाबचंद गोयल (वय ४२ रा.जुना महानगरपालीका जवळ, होसोग हॉस्पिटलच्या पाठीमागे, अहमदनगर ता. जि. अहमदनगर), राकेश बालराज गुंडु (वय ३१ रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, युवराज हॉटेलच्या पाठीमागे, अहमदनगर ता. जि. अहमदनगर), निलेश कृष्णा लोखंडे (वय २९, रा केडगाव, शाहुनगर, अहमदनगर ता. जि. अहमदनगर), आनंद लोढा (रा. कोपरगाव नाव, पत्ता माहिती नाही (फरार), पंडीत पोकळे (रा.कडा ता. आष्टी जि.बीड, नाव पत्ता माहिती नाही (फरार) यांनी संगनमत करुन धनलक्ष्मी, श्री बालाजी, MIND GAME नावाचा ऑनलाईन लॉटरी जुगार विनापरवाना व दर १५ व ५ मिनीटात निकाल जाहीर करुन महाराष्ट्र लॉटरी आयुक्त यांची परवानगी न घेता स्वत:चे आर्थिक फायदासाठी अनधिकृत लॉटरी खेळवितांना व शाम बालु आडांगळे (वय.२३, रा. संजय नगर, आगरकर मळा, काटवन खंडोबा मंदिराजवळ, अहमदनगर ता.जि. अहमदनगर), विजय लक्ष्मण शिंदे (वय ३२, रा.नारायण डोह, अहमदनगर ता. जि. अहमदनगर), विकास दिलीप भिंगारदिवे (वय.३३, रा.काटवन, खंडोबा रोड, हेमंत महाराज केटरोग वाले यांचे पाठीमागे, अहमदनगर ता. जि. अहमदनगर), यासीन रज्जाक शेख (वय ५०,रा. केडगाव, पाटील कॉलनी, अहमदनगर ता.जि. अहमदनगर), अशोक दामोदर कावळे (वय ३६, रा. केडगाव, अहमदनगर ता.जि. अहमदनगर), रामभाऊ सदाशिव घुले (वय २९, रा.देडवाडी ता.जि. अहमदनगर), प्रविण अनिल टेकाळे (वय २४, रा. शिवाजीनगर, नालेगाव ता.जि. अहमदनगर), बाबा महेबुब शेख (वय ४१, रा. बुरुडगाव रोड, भोसले आखाडा ता.जि. अहमदनगर), प्रकाश बबन गायकवाड (वय ५४, रा.बोलेगाव फाटा, ता.जि. अहमदनगर) हे संगणक व इंटरनेटच्या माध्यामाने ऑनलाईन धनलक्ष्मी, श्री बालाजी, MIND GAME नावाच्या लॉटरी जुगारावर पैसे लावून जुगार खेळत असतांना एकूण १ लाख ४० हजार ४८० रु. कि.चे. जुगाराची साहित्य साधने, रोख रक्कम व मोबाईलसह मिळून आले आहे.
तसेच राकेश बालराज हा महेंद्र माखिजा (रा. अहमदनगर, पूर्ण नाव गाव माहित नाही, फरार) व त्यांचे इतर पार्टनर यांच्या मार्फतीने संगनमताने लोकांकडून पैसे घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईल फोनद्वारे बिगो नावाच्या ऑनलाईन चालणारा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला, त्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. / २०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ चे कलम ४ व ५ सह लॉटरी (विनियमन) अधिनियम १९९८ चे कलम ७ (३), ९(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!