नगरात गावठी कट्टा बाळगणारा पकडला ; एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरामध्ये विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्यास पकडून त्याच्याकडून १ गावठी कट्टा व १जिवंत काडतूस जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
अनिकेत राजेंद्र वडागळे (वय २४, रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर, जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ विजय वेठेकर, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने तारकपुर ते रामवाडी रोडला सापळा लावला. त्या ठिकाणी एक संशयीत मिळून आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत राजेंद्र वडागळे असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये ३० हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस, तसेच ५० हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक ऍ़क्सेस दुचाकी असा एकूण ८० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे गावठी कट्टयाबाबत विचारपुस करता त्याने कट्टा विक्री करण्याकरीता आणला असल्याची कबुली दिली आहे. एलसीबीचे पोना ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४८५/२०२३ आर्म ॲक्ट ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहे.
नगरातील काॅलेज परिसरात विनाकारण फिरणाऱ्या २२ टवाळखोर मुलांवर एलसीबी टिम’ची कारवाई
Nagar Reporter
अहमदनगर : शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या २२ टवाळखोर मुलांवर अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार सपोनि गणेश वारुळे, हेमंत थोरात, सफौ. राजेंद्र वाघ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, विजय वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, पोना विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, पोकॉ सागर ससाणे, चालक पोकॉ अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
पोलिसांकडे आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने
अहमदनगर एलसीबी टिम’ने अहमदनगर शहरातील न्यु आर्ट ऍ़ण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर, पेमराज सारडा महाविद्यालय परिसरामध्ये पेट्रोलिंग करुन महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या व महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना त्रास होईल असे वर्तन करणाऱ्या २२ मुलांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर आहे. मिळुन आलेल्या मुलांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असून, मुलांना व त्यांचे पालकांना याबाबत समज देण्यात आली आहे.
अहमदनगर शहरामध्ये लहान मुलांचे किरकोळ भांडणातुन घडणारे शरिराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकरीता तसेच महाविद्यालयामध्ये येणारे – जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सुरक्षेकरीता यापुढेही अहमदनगर शहरामधील महाविद्यालय, विद्यालये, शाळा परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने पेट्रोलिंग करुन महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणारे टवाळखोर मुलांवर कारवाई करण्यात येणार आहे.